विवाहितेस शिवीगाळ करीत केली धक्काबुक्की

वर्धा : पतीस उठविण्यासाठी आलेल्या व्यक्तीने विवाहितेस शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. ब्राह्मणवाडा गावात ही घटना घडली. शक्ती इंगळे हा घरासमोर झोपून असताना शेजारी राहणारा कविश्वर तायडे याने घरात प्रवेश केला आणि शक्तीला उठवू लागला. दरम्यान शक्तीची पत्नी काजल हिने त्यास नंतर येण्यास सांगितले असता कविश्वर तायडे याने शिवीगाळ केली. शिवीगाळ करण्यास हटकले असता धक्काबुक्की करीत मारहाण केली. दरम्यान काजलची सासू मध्यस्थी आली असता तिलाही मारहाण केली. याप्रकरणी खरांगणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास जहर पोलीस करीत असल्याची माहिती असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here