

पुलगाव : दुचाकीच्या कारणातून झालेल्या वादात युवकाला दोघांनी मारहाण केली. तसेच चाकूने बोटावर वार करीत जखमी केले. हरिरामनगर येथे ही घटना घडली.
नितेश चव्हाण हा घरी असताना ओम देविदास केसरवाणी, शुभम केसरवाणी यांनी नितेशच्या घरात शिरुन नितेशला तु दुचाकी बरोबर चालवत जा, असे म्हणत वाद केला. तसेच शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान शुभम केसरवाणी याने खिशातील चाकु काढून नितेशच्या बोटावर वार करीत त्यास जखमी केले. याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.