गटविकास अधिकारी सडमाके यांचे निधन

सेलू : आर्वी पंचायत समिती येथे कार्यरत सहाय्यक गट विकास अधिकारी सुभाष सडमाके यांचे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास सेलू येथील निवास स्थानी दिर्घ आजाराने निधन झाले.
सेलू येथून वर्षभऱ्यापूर्वीच त्यांची आर्वी येथे बदली झाली होती. त्यांचे मूळ गाव झडशी असून समुद्रपूर पंचायत समिती मध्ये विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी सलग पंचवीस वर्षे सेवा दिली. सेलू पंचायत समिती ही मातृ समिती असल्याने त्यांनी या ठिकाणी विशेष उल्लेखनीय कार्य केलेले आहेत. झडशी येथील वादग्रस्त अंगणवाडी सुरू करण्यासाठी त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून नवीन अंगांवाडी स्तलांतरीत केली ही विशेष बाब ठरते. गेल्या चार महिन्यापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांचेवर उपचार सुरु होते परंतु उपचाराला दाद न मिळाल्याने आज सकाळी सेलू येथे त्यांचे निधन झाले. मूळ गाव असलेल्या झडशी येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मागे दोन मुले, पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here