
वर्धा : रस्त्याच्या बाजूला होण्यास सांगणाऱ्या युवकाशी वाद घालून त्याच्या पाठीवर व हातावर अनोळखी दोघांनी सपासप वार करीत त्याला जखमी केले. ही घटना गोंडप्लॉट परिसरात दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.
नीलेश वसंत कोरटेकर (रा. शिवाजी चौक) हा मार्केटमधून काम आटोपून एमएच ३१ ७१० या दुचाकीने पावडे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना किराणा दुकानासमोरील रस्त्यावर दोन अनोळखी युवक उभे होते. नीलेशने त्यांनी रस्त्याच्या बाजूला व्हा, असे म्हटले असता दोघांनी नीलेशच्या पाठीवर व खांद्यावर तसेच हातावर कटरने वार करीत त्याला जखमी करून तेथून पळ काढला.
या प्रकरणी नीलेशने शहर ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस दाखल झाले होते.