सासरच्यांनी जावयास मारहाण करीत जीवे मारण्याची दिली धमकी

वर्धा : मुलाला तुझ्या घरी घेऊन जा, असे म्हणत वाद करून सासरच्या मंडळीने जावयास रॉड, टॉमी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना येळाकेळी येथे २७ रोजी घडली. अमोल देवराव झाडे आणि पत्नी प्रवीणा यांच्यात पटत नसल्याने दोघेही विभक्त राहतात. अमोल मुलगा हार्दिक याला सोडण्यासाठी प्रवीणा राहत असलेल्या तिच्या वडिलांकडे गेला असता, प्रवीणाने मुलगा तुझ्याकडेच ठेव, असे म्हटले. अमोलने मुलगा लहान आहे, असे म्हटले असता, प्रवीणा झाडे, सविता गव्हाळे, रवींद्र गव्हाळे, प्रमोद गव्हाळे यांनी शिवीगाळ करीत रॉड, टॉमीने बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या घरगुती वादातून हाणामारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे यातून मोठी घटना घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here