

वर्धा : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील लहुदास बिजाराम अंबाडरे (५०) रा. भवानपूर यांचा मृत्यू झाला. हा अपघात धोंडगाव-वडगाव मार्गावर शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास झाला. लहुदास अंबाडरे हे व्यवसायाच्या निमित्ताने एम.एच. यू. ५७३४ क्रमांकाच्या दुचाकीने वडगावच्या दिठोने जात होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात लहुदास हे गंभीर जखपी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला सेवाग्राम येथीळ रुग्णालयाकडे रवाना केले. तेथे लहुदास यांची प्राणज्योत मालवली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला. या अपघाताची नोंद गिरड पोलिसांनी घेतली आहे.