कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

वर्धा : तालुक्यातील वडनेर येथे कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २६ जुलै रोजी उघडकीस आली आहे. मृतक शेतकऱ्याचे नाव कैलास खुशाल उमरे ( ४८) रा. वडनेर आहे.

मृतक कैलास उमरे यांची पत्नी विद्या कैलास उमरे यांनी या संबंधी वडनेर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार कैलास उमरे यांच्याकडे दोन एकर शेतजमीन होती. त्यांनी वडनेर येथील बॅक ऑफ इंडियाच्या शाखेतून कर्ज काढून शेती केली होती. मात्र त्यांच्यावर वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे ते नेहमी विचारात राहत होते व त्यांना अशातच दारुचे व्यसन लागले. कैलास याने २५ जुलै रोजी रात्री अर्धवट जेवन केले व रात्री दीड वाजताच्या सुमारास ते घरून निघून गेले व त्याचा शोध घेत असताना घरा जवळील सरकारी विहीरीत रात्री टार्च ने बघितले असता कैलास उमरे यांची चप्पल विहिरीत पाण्यावर तरंगताना दिसली.

कैलास उमरे यांचे प्रेत विहिरी बाहेर काढून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला असून या घटनेचा पुढील तपास वडनेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास प्रशांत वैद्य,तु षार इंगळे, पोलीस कर्मचारी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here