सोयाबीनची ‘बीबीएफ’ पद्धतीने पेरणी गरजेची : प्रशांत भोयर

वर्धा : ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करणे ही कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आता काळाची गरज बनली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्यांनी बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी असा सल्ला कृषीपर्यवेक्षक प्रशांत भोयर यांनी दिला.

रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करून सोयाबीनची पेरणी केल्यास रुंद वरंबा किंवा गादी वाफ्यावर ३ ओळींत पेरणी होऊन दोन ओळींतील अंतर ४५ सेमी आणि दोन रोपांतील अंतर १५ सेंमी राखले जाते. त्यामुळे सोयाबीनचे एकरी फक्त १५ ते १६ किलो बियाणे लागते. त्यामुळे बीबीएफ पेरणी पद्धत ही आता विक्रमी उत्पादनासाठी गरजेची झाली आहे असे श्री भोयर राष्ट्रहित न्यूजशी बोलताना म्हणाले.

बीबीएफ तंत्रज्ञानाचे फायदे

*बीबीएफ पेरणी यंत्राच्या साहाय्याने उतारास आडवी पेरणी केल्याने मूलस्थानी जलसंधारण होते.

*बीबीएफ मुळे आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून अधिकचे उत्पन्न मिळते

*पावसात खंड पडल्यास अथवा पाणी कमी असल्यास या पद्धतीमुळे वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जातो.पिकाला पाण्याचा ताण पडत नाही*

*पाऊस जास्त झाल्यास या पद्धतीमधील सरी मधून अतिरिक्त पाणी बाहेर पडते.

*मुबलक हवा, सूर्यप्रकाश मिळाल्याने पिकाची जोमदार वाढ होते. किडरोग प्रमाण कमी होते

*सोयाबीन पेरणीसाठी 20-25 % बियाणे कमी लागते, पाण्याची बचत होते, उत्पन्नामध्ये 25-30 % हमखास वाढ होते.

*पिकाची आंतरमशागत करणे, पीक मोठे झाल्यावर सरी मधून औषध फवारणी करणे, आवश्यकता भासल्यास स्प्रिंकलर द्वा संरक्षित पाणी देण्यासाठी ही पेरणी पद्धत चांगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here