अनुसुचित जातीच्या बचतगटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टरसह उपसाधने

वर्धा : शासनाने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यामध्ये कल्टीवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर पुरवठा करण्याची योजना सुरु केली आहे. त्यानुसार बचत गटांना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व उपसाधने उपलब्ध करण्यात देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक स्वयंसहायता बचत गटांनी दि. 19 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी केले आहे.

इच्छुक स्वयंहाय्यता बचतगट अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील असावा व शासकीय यंत्रणेकडून नोंदणीकृत असावा. गटाचे बँक खाते असावे. बँक खात्यासोबत आधार क्रमांक संलग्न असावा. दोनही कागदपत्राची झेरॉक्स प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. बचत गटातील 80 टक्के सदस्य अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील व सर्व सदस्य महाराष्ट्रातील रहिवासी असावे. सदस्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र तसेच रहिवासी पुराव्या बाबत अधिवास प्रमाणपत्र, राशनकार्ड, आधारकार्ड, निवडणुक कार्ड इत्यादी पुरावा जोडणे आवश्यक आहे. मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने याच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार रुपये इतकी आहे.

स्वयंसहाय्यता बचत गटांनी या कमाल मर्यादेच्या 10 टक्के स्वहिस्सा म्हणजेच 35 हजार रुपये इतका आहे. या व्यतिरिक्त बचत गटांस ट्रेलर व ट्रॅक्टर यांच्या आरटीओ कार्यालयातील नोंदणीचा खर्च तसेच जकात कर लागू असल्यास स्वत: भरावा लागणार आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधीक अर्ज आल्यास लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. बचत गटातील सदस्यांची तपशिलवार यादी तसेच मिनी ट्रॅक्टर खरेदीबाबतचा ठराव अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. योजनेबाबत अटी व शर्ती शासन निर्णयानुसार राहणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे समाज कल्याण विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here