विहिरीत पडलेल्या गायीला प्राणिमित्रांनी दिले जीवदान! गरूडझेप च्या पुढाकाराने वाचला जीव

देऊरवाडा/आर्वी : स्वत:च्या जिवाची पर्वा न करता सार्वजनिक विहिरीत पडलेल्या गायीचे प्राण वाचवून प्राणिमित्रांनी जीवदान दिले. सोमवारी डॉ. पंकज चोरी यांच्या घरामागील एका सार्वजनिक विहिरीत जाय पडली होती.

दरम्यान गाय विहिरीत पडून जखमी झाल्याची माहिती तेथील काम करणाऱ्या नागरिकांनी गरूडझेप संस्थेचे सचिव अनिल माहुरे यांना दिली. माहिती मिळताच प्राणिमित्रांनी घटनास्थळी धाव घेत कठीण परिस्थितीतून गायीला बाहेर काढले.

घटनास्थळी प्राणिमित्र तुषार साबळे, अनिल माहुरे, मिलिंद मसराम, रवी शिंपीकर, पंकज शेलोटे, विक्री मसराम, ऋतिक वडणारे, मनीष ठाकरे, रूपेश गौतम आदींनी बचाव कार्यात मदत केल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here