मोटरसायकल अपघातात व्यावसायिक युवक ठार

देवळी : देवळीच्या खटेश्वर मंदिर परिसरातील इलेक्ट्रिकल व्यावसायिक हृर्षल दिवाकर भट (२७) हा मोटरसायकल अपघातात ठार झाला. शनिवारच्या दुपारी त्याचा मृतदेह व दुचाकी ईसापूर नजीकच्या उमरे पेट्रोल पॅप जवळील हायवेरोडच्या पुलाच्या आत आढळून आली.

शुक्रवारी सायंकाळी मृतक हर्षल हा एम.एच. 3२ ए.जी, ७८९ क्रमांकाच्या दुचाकीने कळंब येथे व्यवसायासाठी गेला होता. दरम्यान रात्रीचे वेळेस घरी परत येत असताना ईसापूर जवळ त्याचे गाडीचे पेट्रोल संपले. काही अंतर गाडी ओढून नेत त्यानं वाहनात इंधन भरले. दरम्यान याच पेट्रोल पंपजवळ त्याच्या दुचकीचा अपघात झाला. मुलगा घरी न परतल्याने देवळी पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानंतर हर्षलचा मृतदेह व दुचाकी सापडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here