वर्ध्याचे आमदार करोनाबाधित! उपचारांसाठी रुग्णालयात दाखल; सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु

वर्धा – वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर हे करोनाबाधित असल्याचा अहवाल समोर आला आहे. काल रात्री ते स्वतः सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
दरम्यान, आमदार भोयर यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन राहण्याची विनंती केली आहे. आमदारांच्या पत्नी व मुलांचा चाचणी अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्टपासून ते नागपूर येथे होम क्वारंटाइन होते. ताप जाणवू लागल्याने त्यांनी कुटुंबापासून स्वतःला दूरच ठेवले होते.
माजी खासदार विजय मुडे यांच्या निधनावेळी तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात ते याच कारणास्तव सहभागी झाले नव्हते. त्यांच्या वाहन चालकाचा करोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. काल रात्रीच ते थेट नागपुरातून सावंगीच्या रुग्णालयात दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here