मद्यपी बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न! आर्वी नाका परिसरातील घटना

वर्धा : मद्यपी बापाने त्याच्याच मुलीला मारहाण करीत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, याप्रकरणी २ रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. नराधम बाप आणि त्याची पत्नी हे विभक्त राहतात. मागील वर्षभरापासून मद्यपी बाप त्याच्या अल्पवयीन मुलीला आणि मुलाला कोणत्या ना कोणत्या कारणावरून मारहाण करायचा, तसेच घरात कुठलीही वस्तू तसेच खाण्याचे साहित्य आणत नसून तो परिसरातीलच एका महिलेला पैसे देत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

१२ एप्रिल रोजी नराधम बाप हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि १७ वर्षीय मुलीला विनाकारण मारहाण करू लागला. मुलीने आरडाओरड केली असता त्याने मुलीच्या अंगावरील कपडे फाडून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अखेर मुलीने वडिलांना धक्का देऊन तेथून पळ काढत ही बाब तिच्या आईला जाऊन सांगितली. आईने मुलीला घेऊन रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार २ रोजी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here