पोळ्याच्या तोंडावर बैलाचा मृत्यू! ५० हजारांचे झाले नुकसान

तळेगाव : नजीकच्या रानवाडी येथे विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसल्याने बैल दगावला. या घटनेमुळे शेतकरी प्रदीप दिगांबर रानोटकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रदीप रानोटकर यांचे मौजा रानवाडी शिवारात शेत आहे. शेतात पिकाला डवरणी केली सुरू असताना, विद्युत प्रवाहित उपकरणाचा स्पर्श झाल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे प्रदीप रानोटकर यांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. ऐन पोळ्याच्या तोंडावर ही घटना घडली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला महावितरणने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे.

1 / 3
Caption Text
2 / 3
Caption Two
3 / 3
Caption Three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here