

पुलगाव : क्षुल्लक वादातून एका व्यक्तीस टिनाच्या पत्र्याने मारहाण करण्यात आली. हिंगणघाट फैल परिसरात ही घटना घडली. राजेंद्र बेंदले हा घरासमोर उभा असताना मोहन कोठारी हा तेथे आला व त्याने तू माझ्या घराच्या मागील बाजूस घरकामाच्या बल्ल्या का ठेवल्या असे म्हणत वाद करून हातातील टिनाच्या पत्र्याने राजेंद्रच्या डोक्याला मारहाण केली. इतकेच नव्हेतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.