क्षुल्लक वाद चिघळला ; चौघांनी युवकास बदडले

हिंगणघाट : घरासमोरुन सायकल घेवून जायचे नाही, असे म्हणत चौघांनी युवकास काठीने मारहाण करीत जखमी केले. माता मंदिर वॉर्ड परिसरात ही घटना घडली.

पोलीस सूत्रानुसार, रामदास वैद्य हे मुलगा उमेश सोबत दुचाकीवर जात असताना संकेत जामगडे याने तु या रस्त्याने सायकल चालवत जायचे नाही, असे म्हटले, उमेशने याबाबत विचारणा केली असता संकेत जामगडे, सूरज जामगडे, शिवा लोणकर, प्रतिक जामगे यांनी शिवीगाळ करीत लाथाबुक्कयांनी तसेच दगडाने मारहाण केली . याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here