

देवळी : सर्वत्र कोरोणा विषाणुने थैमान घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतीवर असल्याने प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. यातच दारू पिणाऱ्याकडून एकच ग्लासने अनेक जण दारु पीत असल्याने कोरोनाची विषाणूची लागण होण्याची भिती आहे. दारूच्या अड्डायावर देवळीचे ठाणेदार नितिन लेव्हरकर, पोलिस अधिकारी, कर्मचारी याची कारवाई सतत सुरु असुन मागिल महिन्यातील 141 तर नोव्हेंबर महीण्यामध्ये 104 असे एकूण 245 कार्यवाह्या करुन नवीन विक्रम मांडलेला आहे.
देवळी हद्दीत चोरुन लपुन अवैध धंदे सुरु असुन, पोलिस विभागातर्फे कार्यवाही करून देखील ते जूमानत नसल्याने, त्याचेवर प्रभावी वचक बसण्याकरीता दारूविक्रेताचे कंबरडे मोडण्याचा पर्याय ठाणेदार नितिन लेव्हरकर यांनी दारूबंदी मोहीम राबवुन देवळी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी सतत कारवाई करुन , दारूविक्रेते यांचेवर नोव्हेंबर महिन्यात 104 कारवाई करून अशा प्रकारे मागील ऑक्टोबरमध्ये 140 कारवाई करुन दोन महीन्यामध्ये एकूण 244 केसेस दारुविक्रेत्यावर विरुध्द दाखल केल्या आहे. पोलिस विभाग अवैध धंदयावर वचक बसविन्याकरिता सतत प्रयत्नशील आहे. मात्र अशा अवैध व्यवसायीकांना आळा बसण्याकरीता पोलिसांनीच नाहीतर , त्याच्या विरुध्द न्यायालयाने ठोस पाऊल उचलने गरजेचे आहे. अशा अवैध धंदे चालकाना तात्काळ जामीन मिळत असल्याने, ते कारवाहीला घाबरत नसल्याने चित्र दिसुन येत आहे. अशा अवैध धंदयाचालकाचे आर्थिक दुर्बल व्हावे, याकरीता त्याचे जास्तीत जास्त बॉन्ड घेण्याची प्रक्रिया सुध्दा उपविभागीय दंडाधिकारी वर्धा यांनी कराव्यात. जेणे करुन एकापेक्षा जास्त केसेस झाल्यास, या आधारापोटी त्यांचेवर प्रतिबंध बसविता येईल. ठाणेदार नितिन लेव्हरकर यांनी देवळी हद्दीत दारू विक्रेत्यांवर वचक बसविण्याकरिता सतत कार्यरत राहून, नवीन नियोजनबद्ध कार्यप्रनाली वापरुन कारवाई करित , आपली वेगळी छाप देवळी हद्दीत पडल्याची दिसुन येत आहे.