दारूच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा खून! नेरच्या आठवडी बाजारात घडला थरार

नेर : येथील आठवडी बाजारात दारूच्या नशेत फिरत असताना दोन मित्रांमध्ये वाद झाला. एकाने जवळच्या चाकूने मित्राच्या पोटात भोसकून त्याचा खून केला. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली.

सुरेश संतोष वानखडे (२८) रा. भीमनगर असे मृताचे नाव आहे. तो त्याचा मित्र गोलू राजू पवार (२२) याच्यासोबत आठवडी बाजार परिसरातील मच्छी मार्केट भागात दारू पिण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना बोलचालीवरून दोघांमध्ये वाद झाला. दारूच्या नशेत दोघेही हातापायीवर आले. यातच गोलूने त्याच्याजवळ असलेला धारदार चाकू काढून सुरेशच्या पोटावर वार केले.

सुरेश रक्ताच्या थारोळ्यात जागेवर कोसळला. तर संश्नयित गोलूने तेथून पळ काढला. सुरेश आरडाओरडा करीत असताना बाजारात एकच गोंधळ उडाला. त्याला उपस्थितांपैकी काहींनी कसेबसे नेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सुरेशचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सुरेशच्या मागे आई, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांच्या मार्गदर्शनात जमादार भूपेश्नचंद्र ठाकरे, सचिन डहाके, सय्यद अनीस, पवन चिरडे आदी करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here