पती-पत्नीला केली काठीने मारहाण! पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा : मुकुटबन पोलिस स्टेशनअंतर्गत डोंगरगाव येथील घराच्या जागेवरून वाद करून चुलत भावाने, भावाला व वहिनीला मारहाण, अश्लील शिवीगाळ व जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. त्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डोंगरगाव येथील यादव गरिबा काळे अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासह राहतो. गरीबा काळे याचा चुलत भाऊ वनमाली दयाल काळे याने घराच्या जागेवरून वाद घालून गरीना काळे यांच्या घरासमोरील जलतनचे काड्या उचलू लागला असता जलतनाचे काड्या का उचलत आहे असे विचारताच चुलत भाऊ वनमाली याने अश्लील शिवीगाळ करून हातात असलेल्या काठीने मारहाण केली. तेव्हा यादव याची पत्नी भांडण सोडवायला आली असता तिलाही त्याच काठीने तिलाही मारहाण करून जखमी केले. व या जागेवर राहू नका ,ही जागा माझी आहे तुम्ही ही जागा खाली करा” नाहीतर एखाद्या दिवशी तुम्हाला मारून टाकतो अशी धमकी दिली. काही वेळानंतर गरिबा हा मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये वनमाली काळे यांच्या विरुद्ध तक्रार दिली यावरून आरेपी वनमाली विरुद्ध कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास ठानेदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रंजना सोयाम, संजय खांडेकर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here