अज्ञाताने उभ्या कारला लावली आग! साडेचार लाखांचे नुकसान

वडनेर : घराशेजारी असलेल्या गुरुद्वाराच्या बाजूला उभ्या कारला अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये कार पूर्णत: जळाली असून साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे. येथील संगतसिंग जुनी यांच्या मालकीची एमएच ३२ सी. एक्स. ८९१९ क्रमांकाची कार आंबेडकर चौकातील गुरुद्वारासमोरील खाली जागेत उभी करण्यात आली होती.

बुधवारी रात्री अडीच वाजताच्या सुमारास संगतसिंग यांचा मोठा भाऊ नानकसिंग यांना कार जळताना दिसली. याची माहिती संगतसिंग यांना मिळताच त्यांनीही कारजवळ जाऊन बघितले असता, कार पूर्णत: जळाली होती. यासोबतच रमेश चौधरी यांच्याही वाहनाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. डॉ. आंबेडकर चौकातील एका ज्वेलर्सच्याबाहेर कॅमेरे लावले असून बुधवारच्या रात्री २.२५ मिनिटांनी एक पांढर शर्ट घातलेला युवक चौकातील मैदानाकडे जाताना दिसला, त्यानेच या वाहनाला आग लावल्याचा संशय व्यक्‍त होत आहे. याप्रकरणी संगतसिंग जुनी यांनी वडनेर पोलिसांत तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here