पैश्याच्या वादातून दाम्पत्यास मारहाण! पोलिसात तक्रार दाखल

आर्वी : पैशाच्या वादातून दाम्पत्यास मारहाण करीत जखमी केले. संजयनगर परिसरात ही घटना घडली. सुरेश पिटेकर, सुनील नेवारे, अनिल आणि इतर दोघे अश्या पाच जणांनी घरातील खड्डे खोदण्याचे काम घेतले होते.

कंत्राटदाराने याचे पैसे सुनील नेवारे याच्याकडे दिले होते. दरम्यान सुनीलने सुरेशला ५८० रुपये दिल्याने सुरेशने आणखी पैसे हवे असे म्हटले. दरम्यान सुरेश हा सुनीलला कामाचे उर्वरित पैसे मागण्यास गेला असता त्याला सुनीलने मारहाण करीत जखमी केले. सुरेशची पत्नी वाद सोडविण्यास गेली असता तिला ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here