
वर्धा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेला मोबाईल हा निकृष्ट दर्जाचा असून त्याला दुरुतीसाठी चार हजार रुपयाचा खर्च लागतो आणि हा खर्च सेविकाकडून वसुल करण्यात येतो, हा प्रकार बंद करून कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल द्या, तसेच पोषण टँकर एँप्स हे इंग्रजी मध्ये असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम करण्यास अडचण निर्माण होतअंगणवाडी कर्मचारी आहे, एँप्स हे मराठीत करा अशी मागणी आज 5 ऑगस्ट रोजी सिटूच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओबासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल मेसरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चांगल्या क्षमतेचा नवीन मोबाईल द्या, तसेच पोषण ट्रॅकर ॲप मधील असलेल्या त्रुटीची पूर्वता १६ ऑगस्ट पर्यंत करण्यात यावी, अन्यथा १७ ऑगस्ट पासून अंगणवाडी कर्मचारी कधीही प्रत्येक प्रकल्पामध्ये मोबाईल वापसी आंदोलन करून शासनाने दिलेला मोबाईल परत देण्यात येणार आहे.
निवेदन देतांना सिटूचे जिल्हाध्यक्ष भैय्याजी देशकर, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हासचिव रंजना सावरकर, अध्यक्ष अर्चना मोकाशी, सविता जगताप, गुंफा कटारे, जया इंगलो, योगिता लोहकरे, संगीता कोहळे, कांता भोंडे, अर्चना वानखेडे, नीता भवरे, उषा रामटेके, उषा मानकर आदीची उपस्थिती होती.




















































