

खरांगणा मोरांगणा : पुढील शिक्षण घेण्याकरिता वडिलांकडे पैसे नसल्यामुळे मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कामठी खानापूर येथून सामोर आली आहे. नंदिनी भास्कर मडावी असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार नंदिनीचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण झाले असल्याने तिला पुढील शिक्षण घ्यायचे होते. पण सध्या त्यासाठी लागणारा पैसे वडिलांकडे नसल्यामुळे पैसे आल्यानंतर शिक्षण घे असे वडिलांनी सांगितले. त्यामुळे घरच्या अशा हलाखीच्या परिस्थीतीमुळे तीच्यात नैराश्य आले.
घटनेच्या दिवशी तीचे आईवडील कामानिमित्त सकाळीच बाहेरगावी गेले तर भाऊ मजुरीसाठी गेला होता यावेळी ती घरी एकटीच होती नैराश्याने ग्रासल्यामुळे तीने गळफास घेतला. आईवडील संध्याकाळी घरी परतल्यावर त्यांना नंदिनीचा मृतदेह लटतांना दिसला. तीला एम.ए.ला प्रवेश घ्यायचा होता. शवविच्छेदनाकरीता मृतदेह वर्धा येथील सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास आंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात जमादार कांबळी, अमर हजारे करीत आहेत.