भरधाव कारची ऑटोला धडक! दोन गंभीर तीन किरकोळ; पवनार चौफुलीजवळची घटना


पवनार : येथील चौफुली जवळ कारने ऑटोला दोरदार धडक दिली यात अॉटो मधील दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले तर तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवार (ता. २८) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
एमएच ३२ बी ६९२६ क्रमांकाचा प्रवाशी ऑटो हा पवनार वरुन सेलूकडे जात होता दरम्यान एमएच २९ जे ००३५ क्रमांकाची कार आश्रमाकडून वर्धेकडे भरधाव वेगाने जात होती. यात कारने अॉटोला जबर धडक दिल्याने अॉटोमधील भास्कर शिंदे (वय ४५), नारायण शिंदे (वय ६५), हे गंभीर जखमी झाल्याचे प्रत्यक्षदशीने सांगितले. हे दोघेही धपकी येथील रहीवाशी असून श्यामपात्रा शिंदे (वय ३५), रा धपकी, निकिता डोळसकर (वय २५), व चिमुकली आरोही डोळसकर हिला किरकोळ मार लागला आहे. ऑटोचालक संजय सावरकर (वय ३४) रा. सेलू हा सुध्दा कुठलीही दुखापत झाली नाही. सर्व जखमीना कस्तुरबा रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेची माहीती मिळताच सेवाग्राम पोलिस स्टेशनचे बीट जमादार श्री कंगाले घटनास्थळी दाखल होत पुढील तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here