Home ◼️ संपादकीय अँपेची दुचाकीला धडक! दोन गंभीर; सावंगी-पालोती वळण रस्त्यावरील घटना

अँपेची दुचाकीला धडक! दोन गंभीर; सावंगी-पालोती वळण रस्त्यावरील घटना

वर्धा : भरधाव वेगात येणा-या अँपे आटोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना 20 जानेवारी रोजी 11.45 वाजताच्या दरम्यान सावंगी- पालतो वळण रस्त्यावर घडली. दुचाकी क्रमांक एमएच 32 टी 1114 ने चंदू नामदेव वाघमारे हा सोनल प्रफुल्ल जारुडे हिच्यासह सावंगी मेघे येथून पालोतीकडे जात होता.

दरम्यान, अज्ञात अँपे चालकाने भरधाव चालवून दुचाकीला समोरून धडक दिली. यात चंदू वाघमारेसह सोनल जारुडे ही गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी सुरेश नामदेवराव वाघमारे रा. पाळीती यांनी दिलेल्या फिर्यादीबरून अज्ञात अपे चालकाविरुद्ध सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!