
समुद्रपूर : कांढळी येथील शेतकरी अनिल महल्ले यांच्या मालकीचा गोठा बरबडी शिवारात लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली असून, यात शेतकऱ्याचे तब्बल २.५० लाखांचे मुकसान झाले आहे. कांढळी येथील शेतकरी अनिल महाले यांचे बरबडी शिवारात शेत आहे. त्यांनी शेतमाल तसेच शेती उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी शेतात गोठा उभारला. याच गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य तसेच शंभर प्लॅस्टिक पाइप, कृषिपंप, कडबा कटर मशीन, ३० स्पिकलर, ५० टिन, जनावरांचे वैरण असा एकूण २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जळून कोळसा झाला. आगीची माहिती मिळताच तलाठ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. हवालदिल शेतकऱ्याला शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.




















































