अपघातात दुचाकी चालक गंभीर! ग्रामीण रुग्णालयात दाखल

समुद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी पावणेदोन वाजतादरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील जामलगतच्या साईबाबा मंदिरसमोर घडला. राजू मारोतराव आसुटकर (३०) रा. तास, असे जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे.

राजू एम.एच. 3४ बी.जे. ०७१४ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा अपघात झाला. यादरम्यान तेथून गेलेल्या एका टँकर चालकाने एक दुचाकीचालक जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती जाम येथील महामार्ग पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, नरेंद्र दिघडे, नागेश तिवारी, बंडू डडमल, पंकज वैद्य यांनी घटनास्थळ गाठून जखमी अवस्थेत असलेल्या राजूला समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here