सावद शिवारात वीज पडून शेतकरी गंभीर! उपजिल्हा रुगणालयात दाखल

कारंजा (घा.) : शेतातील कामे आटोपून घरी परत जात असलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना नजीकच्या सावद शिवारात घडली. मारोतराव ढोले (६५, रा. सावद) असे जखमीचे नाव असल्याचे सांगण्यात आले.

वीज पडून शेतकरी भाजल्या गेल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिकेला तातडीने पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिकाही अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमी मारोतराव ढोले यांना आर्वी येथील उपजिल्हा रुगणालयात दाखल करण्यात आले. मारोतराव ढोले यांची प्रकृती गंभीर असल्याने मारोतराव यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here