दुचाकीच्या समोरासमोर धडक! दोघजण जागीच ठार; एक जण जखमी

वर्धा : समुद्रपूर-वायगाव गोंड मार्गांवर दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघजण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता घडली. तर दुचाकी चालकाचा सहकारी यात जखमी झाला आहे. प्रदीप कुंभारे रा. हिवरा आणि सतीश भोयर रा. वायगाव गोंड असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार एम एच ३२ ए डी १५६८ क्रमांकाच्या दुचाकीने सतीश भोयर (४० )वर्ष हा वायगाव गोंड वरून समुद्रपूरकडे येत होता. तर हिवरा येथील प्रदीप कुंभारे ( ४०)आणि सहकारी शुभम बहादूरे हे दोघे एम एच ३२सी झेड २७७४ क्रमांकाच्या दुचाकीने समुद्रपूर वरून अंतसंस्काराचे साहित्य खरेदी करून राळेगाव मार्ग हिवऱ्याला जातं होते.

दरम्यान वायगाव गोंड रस्त्यावर गायकवाड यांच्या शेताजवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात सतीश भोयर आणि प्रदीप कुंभारे यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप कुंभारे यांचा सहकारी शुभम बहादुरे जबर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उप निरीक्षक अपेक्षा मैश्राम, पोलीस कर्मचारी सिरसाट घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here