जळकोट येथे अद्यावत तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी तात्काळ प्रस्ताव दाखल करा. राज्यमंत्री संजय बनसोडे यांची घोषणा.

 

सिद्धेश्वर वामनराव कुलकर्णी
कार्यकारी संपादक लातूर
मो. 7666462744
दखल न्युज/दखल न्युज भारत

लातूर दि. 13/07/2020 रोजी जळकोट तालुक्यातील क्रिडा संकुल उभारणीसाठी क्रिडा विभागाने तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा व स्वच्छता सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम रोजगार हमी भूकंप पुर्नवसन व संसदीय कार्य राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या. लातूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित उदगीर व जळकोट तालुक्यातील तालुका क्रिडा संकुल उभारणी कामाच्या आढावा बैठकीत बोलत होते . या बैठकीस उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेटी, उदगीर तहसीलदार व्यंकटेश मुंडे जळकोट तहसीलदार संदिप कुलकर्णी, बस्वराज पाटील, नागराळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, उपस्थित होते.
या बैठकीत बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले कि जळकोट व उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलाची कामे ताबडतोब मार्गी लावण्यासाठी जळकोट तालुका क्रीडा संकुलाचा प्रस्ताव ताबडतोबीने दाखल करावा अशा सूचना संबंधितांना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here