१,९४४ व्यक्ती देणार सात केंद्रांवरून राज्य सेवा पूर्व परीक्षा

वर्धा : कोरोना संकट ओढवताच पुढे ढकलण्यात आलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवार, १४ मार्च रोजी होणार आहे. त्यासाठी वर्धा जिल्ह्यात एकूण सात परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आली असून, परीक्षेसाठीची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी वर्धा शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल, न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेज, गो.से.वाणिज्य महाविद्यालय, यशवंत महाविद्यालय, केसरीमल कन्या शाळा, सुशल हिम्मतसिंगका विद्यालय तसेच पिपरी (मेघे) भागातील अग्रग्रामी विद्यालय ही परीक्षा केंद्रं देण्यात आली आहेत. या सात परीक्षा केंद्रांवरून रविवार, १४ मार्चला एकूण १ हजार ९४४ व्यक्ती राज्य सेवा पूर्व परीक्षा देणार आहेत.

त्यासाठीची संपूर्ण तयारी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या मार्गदर्शनात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, अधीक्षक महेंद्र सूर्यवंशी, अव्वल कारकून माया चावडीपांडे, अजय लाडेकर, पवन मडावी यांनी पूर्ण केली आहे. कोरोना संकटा ओढावल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तर आता सात केंद्रांवरून ही परीक्षा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here