
वर्धा : पैशांच्या वादातून युवकाला मारहाण करीत पोटाचा चावा घेत त्यास जखमी केले. ही घटना कृष्णनगर परिसरात घडली. महावीर वासुदेव वरहरे याचा दुचाकी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने पालाश पवार याला महिनाभरापूर्वी दुचाकी खरेदी करून दिली होती. त्याचे कमिशनचे पैसे देणे बाकी होते. महावीर घरी गेला असता तेथे पालाश पवार उभा होता. महावीरने कमिशनचे पैसे मागितले असता केतन राखुंडे आणि पालाश पवार यांनी महावीरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पोटाला चावा घेत जखमी केले, याप्रकरणी रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.






















































