पुलगावच्या टेक्सटाईल मिलमध्ये आग! कॉटन वेस्ट जळून झाले खाक; लाखो रुपयांचे नुकसान; अग्निशमन बंबाच्या साहाय्याने नियंत्रण

पुलगाव : येथील जयभारत टेक्सटाईल मिलमध्ये अचानक आग लागून बाहेर परिसरात जमा असलेले कॉटन वेस्ट जळून खाक झाले. यात टेक्सटाईल्स मिलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, ही. घटना जयभारत टेक्सटाईल मिलमध्ये दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास कॉटन वेस्टमधे आग लागल्याचे दिसले. पाहता पाहता आगीने पेट घेत संपूर्ण कॉटन वेस्टचे गोदाम व जवळपासच्या कॉटन वेस्टला आपल्या कवेत घेतल्याने कापूस जळून खाक झाल्याची माहिती जयभारत टेक्सटाईलचे व्यवस्थापक शेख यांनी दिली.

लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या नुकसानाचा अंदाज मिल प्रशासनाने वर्तविला आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी, ती आटोक्या आणण्यासाठी पुलगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाल पाचारण करण्यात आले होत प्रशासकीय अधिकारी अमर बांग चंद्रकांत ईश्‍वरकर, अग्निशमन दलाचे प्रमुख निखिल आटे यांच्या मार्गदर्शनात संदीप अजमिरे, कुणाल गणवीर व टेक्सटाईल मिलच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी परिसरात एकच गर्दी उसळली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here