गिरड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजू नौकरकर तर उपसरपंचपदी मंगेश गिरडे! जल्लोशात स्वागत

गिरड : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजू नौकरकर तर उपसरपंचपदी मंगेश गिरडे बहुमताने निवड करण्यात आली.
समुद्रपूर तालुक्यातील गिरड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. गिरड ग्रामपंचायतीत 15 सदस्यांनाचा समावेश होता. यात मनसेचे 3 सदस्य, क्रांग्रेसचे 2 शिवसेनेचे एक सदस्य तर राष्ट्रवादी क्रँग्रेसकडे एक आणि भाजपाकडे आठ सदस्य सदस्य मिळवून निवडणूक आले होते.

मात्र भाजपाकडे बहुमत असतांना गटबाजीच्या राजकारणामुळे बहुमतमत सिद्ध करता आले नाही तर प्रत्येक पक्षाने सदस्यांनाची ओढातोड करीत सरपंच पदाच्या निवडणुकीपर्यंत कोण सरपंच बनणार याकडे लक्ष लागले होते. भाजपाच्या गटातून राजू नौकरकर यांनी स्वतंत्र सभासदांना वेगळे घेऊन सत्ता स्थापन केली. झालेल्या निवडणूक प्रक्रियेत सरपंच पदासाठी भाजपा गटाचे दोन सदस्यांनी आमोरासमोर अर्ज दाखल केले होते. यात भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य शेख इस्त्राईल आणि राजू नौकरकर समावेश होता. मात्र शेख इश्राईल यांनी वेळेवर अर्ज मागे घेतला.

सरपंच पदाची निवड प्रक्रिया राष्ट्रवादी समर्पित उमेदवार राहुल गाढवे आणि राजू नौकरकर यांच्या झाली. राजू नौकरकर यांच्या बाजूला नऊ सदस्यांनी मतदान केले. तर राहुल गाढवे यांच्या बाजूला 6 सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे तीन मतांनी राजू नौकरकर यांची सरपंच पदासाठी निवड झाली.

उपसरपंच पदासाठी मनसेचे उमेदवार मंगेश गिरडे यांच्या विरुद्ध सेनेच्या प्रीती पोयाम यांच्या मतदान प्रक्रिया झाली. यात मंगेश गिरडे यांना 9 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्येला 3 मतांनी पराभूत व्हावे लागले.गिरड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रियेकडे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. मात्र गटबाजीमुळे एकाही पक्षाला बहुमत मिळुनही सिद्ध करता आले नाही. हे मात्र खरे
गिरड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजू नौकरकर तर उपसरपंचपदी मंगेश गिरडे बहुमताने निवड झाल्याने काँग्रेसचे माजी सरपंच मुरलीधरजी पर्बत , दिपक पंढरे , भाजपचे ज्येष्ठ सदस्य अरुण मोटघरे , मोहन गिरडे नूतन गिरडे मारोती गुंडे मनसेचे तालुकाध्यक्ष निलेश खाटिक , अतुल काळबांडे,मनोज गिरडे मुकेश मोटघरे आदींनी अभिनंदन केले.

भाजपची स्वबळावर सत्ता नाही…

पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत होते परंतु सरपंच पदासाठी राजु नौकरकर आणि माजी पंचायत समिती सदस्य शेख इस्राईल यांच्यात संघर्ष सुरू होता हा निर्णय आमदार समीर कुणावर यांच्या कडे होता सरपंचपदी राजु नौकरकर यांची घोषणा झाल्याने शेख इस्राईल यांनी नकार दर्शविला राजु नौकरकर यांनी मनसे व काँग्रेस सोबत वेगळी चुल मांडत सरपंचपदी विराजमान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here