कारची दुचाकीला धडक! दुचाकीस्वार जागीच ठार

समुद्रपूर : नागपूर चंद्रपूर महामार्गवरील नंदोरी चौरस्त्यावर रोड क्रॉस करीत असताना दुचाकी व कारच्या धडकेत दिवाकर चंफत निशाणे (42) रा. नंदोरी हा ठार झाला तर कमलाकर पाटील हा जखमी झाला. ही घटना आज 4 रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाकर निशाणे व कमलाकर केवलंदास पाटील हे दोघेही दुचाकी क्रमांक एम. एच. 32 ए. ओ. 0259 महामार्ग चौरस्ता व ओलांडून जात असताना नागपूरकडून चंद्रपूरकडे जात असलेली एम. एच. 31 इ. ए. 7085 क्रमांकाच्या कारने पुढे अचानक दुचाकी आल्याने धडक दिली. यात दुचाकी चालक दिवाकर निशाणे याचा जागीच मृत्यू झाला तर कमलाकर पाटील गंभीर जखमी झाला दोघांनाही सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले असता दिवाकर निशाने याला वैद्यकिय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. तर कमलाकर पाटील याला गंभीर जखमी केले. घटनेचा तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम, पोलिस कॉन्स्टेबल रामहरी सिरसाट करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here