

अल्लीपूर : पैशाच्या वादातून पतीसह सासरच्या मंडळीने मायलेकीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. धोत्रा कासार येथील वीटभट्टीवर ही घटना घडली.
पूजा टेकाम हिचे पती शिवशंकर टेकाम याने तीला पैशाचा व्यवहार दिला होता. दरम्यान सासरच्यांनी वाद केला. पूजा नेहमीप्रमाणे कामावर गेली असता पती शिवशंकर, रामा टेकाम, सुमित्रा टेकाम, प्रेम टेकाम यांनी घरगुती कारणातून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पूजाची मुलगी वाद सोडविण्यास गेली असता तिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी अल्लीपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या घरगुती कलहातून हाणामारीच्या तक्रारी पोलीस ठाण्याच्या पायऱ्या ओलांडत आहे.