“त्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करावा”

👉खा. अमोल कोल्हे ची सरकारकडे मागणी ; यासंदर्भातील नाराजी खा.कोल्हे आणि ट्विटरवर केली व्यक्त

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
छत्रपती संभाजी महाराजांच्या ३५९ व्या जयंती १४ मे रोजी (तारखेप्रमाणे) साजरी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील ठाकरे सरकारकडे एक मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महारांचे नाव थोर महापुरुषांची दिनविशेष यादीत नसल्याबद्दल कोल्हे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटवरुन त्यांनी यासंदर्भात आपली नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर राज्य सरकाने यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे.
कोल्हे यांनी मंगळवारी ट्विटवरुन छत्रपती संभाजी महाराजांच्या नवाचा उल्लेख राज्य सरकारच्या महापुरुषांशीसंबंधित दिनविशेष यादीत नसल्याचे निर्दर्शनास आणून दिले. “महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही,” असं कोल्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या औपाचरिक ट्विटर हॅण्डलला टॅग करत, “विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी,” असंही म्हटलं आहे.स्वराज्यरक्षक संभाजी’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेत कोल्हे यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील साकारली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here