शासनाच्या मदतीकडे ऑटोचालकाची पाठ! जनजागृतीत आरटीओ माघारले; केवळ हजार लाभार्थ्यांकडून प्रतिसाद: साडेतीन हजार परवानाधारक

वर्धा : लॉकडाउनच्या काळात सर्वच व्यवहार बंद असल्याने ऑटोचालकांचा व्यवसाय गेला. यात झालेल्या नुकसानात मदत म्हणून राज्य शासनाने नोदणीकृत ऑटोचालकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत मिळण्याकरिता ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. असे असताना हे अर्ज करण्याकडे ऑटोचालकांनी पाठ केल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात उप प्रादेशिक कार्यालयात एकूण परवानाधारक ऑटोचालकांचो संख्या साडेतीन हजार आहे. असे असताना केवळ हजार अर्ज आले आहेत. यातोल ६३९ ऑटोचालकांना ही मदत मिळाली आहे. इतर ऑटोचालक या मदतीकरिता पुढाकार घेत नसल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून याकरिता अर्ज येणे अपेक्षित आहे. मात्र या चालकांकडून हे अर्ज भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक ऑटोचालक या मदतोपासून वंचित आहेत.

शासनाने योजना जाहीर केली त्या काळापासून अनेकवार अर्ज करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय जिल्हा प्रशासनाच्या वतीने ऑटोचालकांना सोईचे व्हावे याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या कार्यालयात एक कर्मचारी देण्यात आला आहे. त्याला हृ अर्ज भरण्याकरिता ऑटोचालकांना मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. असे असतानाही त्यांच्याकडून अर्ज भरण्याकडे पाठ करण्याचा प्रकार होत आहे.

३१५ अर्ज नामंजूर

वर्ध्यात आतापर्यंत १ हजार १५४ ऑटोचालकांनी अर्ज केले. यात काही त्रुटी आढळल्याने तब्बल ३१५ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तर केवळ ६३९ जणांना ही मदत मिळाली आहे. अर्ज नामंजूर करणाऱ्यांनी कारणे विचारण्याकरिता किमान कार्यालयात येणे अपक्षित होते. परंतु, तसेही झाले नाहो. यामुळे अनेक लाभार्थी लाभापासून वंचित आहेत.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अपयशी

राज्य शासनाने राबविलेल्या योजलेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पाहोचविण्याची जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन काय़ांलयाकडे देण्यात आली. यामुळे ही माहिती प्रत्येक लाभारथ्यांपर्यंत पाहचणे अपेक्षित होते. या कार्यात मात्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अपयशी ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here