

वर्धा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच शहरात भेट दिली. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर यांनी राज ठाकरे यांना शांतीचे प्रतीक असलेला चरखा भेट दिला.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच संपूर्ण विदर्भाचा दौरा केला. याप्रसंगी त्यांनी वर्ध्यातील विश्रामगृहावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला व विधानसभा निवडणुक ताकदीने लढण्याचे आदेश दिले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम दांडेकर यांनी राज ठाकरे यांना चरखा भेट दिला. याप्रसंगी प्रथमेश बोरकर, मयुर दांडेकर, विकेश नागोसे आदि मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे यांनी या अनोख्या भेटीसाठी शुभम दांडेकर यांचे तोंडभरून कौतुक केले व भेटीचा स्वीकार केला.