दुचाकी चोरीसह घरफोडीतील चोरटा गजाआड! गुन्हे शोध पथकाची कारवाई; रोखेसह दुचाकी हस्तगत

वर्धा : दुचाकी चोरीसह दोन कृषी केंद्रात चोरी करणार्‍या अट्टल चोरट्यास शहर ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने स्टेशन फैल परिसरातील रेल्वेस्थानकाहून अटक केली. त्याच्याकडून चोरीतील दुचाकी आणि रोख रक्‍कम हस्तगत करण्यात आली. शंकर मेंढे यांची दुचाकी सेवाग्राम रस्त्यावर असलेल्या वैष्णवी कॉम्प्लेक्स परिसरातून चोरी गेली होती.

तसेच श्यामसुंदर किसनळाल चांडक आणि रोशन चांडक यांच्या सिंदी लाईन परिसरात असलेल्या कृषी केंद्रात चोरी झाली होती. या घटनांची तक्रार शहर पोलिसात दाखल करण्यात आली होती. चोरीतील घटनेचा तपास गुन्हे शोध पथकाकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने तपासचक्र फिरवून गोपनीय माहितीनुसार, आरोपी मंगेश माधव बोंदरे रा. कुरझडी फोर्ट जि. वर्धा हा स्टेशन फैलळ परिसरात असलेल्या रेल्वेस्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडील एम.एच.3२ यू, ६१७९ क्रमांकाची दुचाकी आणि १४६५ रुपये रक्‍कम जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके,उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या निर्देशात दिवाकर परिमल, सुभाष गावंडे, पवन निलेकर, सुभाष राऊत यांनी केला असून, पुढील तपास दिवाकर परिमल करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here