बाप- लेकास केली रॉडने मारहाण! गंभीर जखमी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : कौंढणपूरवरून आर्वीकडे येत असलेल्या मुलगा व त्याच्या वडिलांना आरोपींनी रस्त्यामध्ये अडवून दोघांनी रॉडने मारहाण केळी. त्यात मुलगा जखमी झाला. ही घटना आर्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदपूर स्मशानभूमी जवळ घडली. रोशन विजय लिल्होरे रा. नादपूर हा दुचाकी क्र. एम. एच. 32 एस 6686 ने सासू अनिता दमाये हिला भेटण्यासाठी सायंकाळी 21 एप्रिल रोजी 8 वाजता गेला होता. त्यानंतर पत्नीला सोबत घेऊन कौंढणपूरवरून आर्वीकडे निघाला.

दरम्यान वाटेत आरोपी अजिंक्य मालाधरे हा स्मशानभूमीजवळ आडवा झाला. याच्यासोबत जुना वाद होता. आरोपीने दुचाकची चाबी काढून घेतलो. त्यानंतर आरोपीने त्यांचे वडील दिनेश मालाधरे यांना फोन करून बोलविले. त्यानंतर दोघांनी लोखंडी रॉडने डोक्यावर, पाठीवर, पायावर जबर मारहाण केली. याच दरम्यान रोशन लिल्होरे यांचे वडील आले. ते वाद सोडविण्यास गेळे असता त्यांना सुद्धा आरोपी दिनेश मालाधरे यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी रोशन विजय लिल्होरे याच्या तक्रारीवरून आर्वी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here