पवनार परिसरात विद्युत ताराच्या स्पर्शाने ३ म्हशीचा मृत्यू! वितरण विभागाच्या अभियंत्याची अरेरावी

पवनार : येथील राऊत लेआऊट परिसरात विद्युत तारांच्या स्पर्शाने ३ म्हशीचा मृत्यू झाला तर यात तीन गुराखी बचावल्याची घटना सोमवार (ता. ६) दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास वीज वितरणाच्या हलगर्जीपणामुळे घडली. भीमाबाई सयाजी माहापुरे असे म्हैसपालक महिलेचे नाव आहे. यांचे २ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

सोमवारी नेहमीप्रमाणे गुराखी गणेश सोडीत, बालू माहापुरे, मंगेश सोडीत हे तिघे आपल्या कळपातील म्हशी चरण्याकरिता घेऊन जात आसताना राऊत लेआऊट परिसरातील खांबावरून गेलेल्या जीवंत विद्युत तारे जमीणीवर लोंबकळत पडल्या होत्या म्हशी चारा खाण्याकरीता जाताच यातील ३ म्हशीना या वीजतारांचा स्पश्र झाला यात म्हशींचा जागीच मृत्यू झाला. तर म्हशींच्या मागावर असलेले तीघे गुराखी सतर्कतेने बचावले.

जीवंत विजतारा रात्रीच्या पावसामुळे रात्रभर तुटून जमीणीवर पडून होत्या मात्र याची वितरण विभागाला माहितीच नव्हती या मार्गाने नागरीकांची येजा सुरु असते या तारांना स्पर्श होवून एखाद्या व्यक्तिची जीवितहानी होण्याची शक्यतायत होती मात्र ही अप्रिय घटना घडली नसल्याने जिवीतहानी झाली नाही.

घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. नागरीकांनी या घटनेची माहिती महावितरण विभागाच्या कनिष्ठ अभियंता श्री कोरो यांना विचारणा केली असता, अरेरावीच्या भाषेत उत्तर देऊन आपली मुजरी कायम ठेवली. श्री कोरो हे पवनार येथील महावितरण कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत असून ते नेहमीच पवनार वासीयांन सोबत वाद घालत असल्याचे दिसते यावेळी नागरीकांनी रोष व्यक्त केला असता त्याने घटनास्थळावरुन पळ काढला.

अभियंत्याची नागरीकांना तमदाटी….

येथील विज वितरण विभागाच्या भोंगळ कारभाराविषयी नागरीकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र यावर कोणतीच उपाययोजना होत नाही येथील अभियंता श्री कोरे हा करीत नाही नागरीकांनी विचारणा केल्यास नागरीकांशी उद्धट वागणुक देतो. अनेकांना दमदाटी करीत असतो मार्त या अभियंत्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने याचे वरिष्ठ अधिकार्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा सध्या गावात चालू आहे.

प्रतिक्रीया…

तुमच्याशी बोलण्यास मी बांधील नाही तुमच्यासारखा मी रिकामटेकडा नाही माझ्यामागे भरपुर काम आहे. तुम्हाला तितकेच काम आहे तुमच्याच्यानी जे होते ते करुन घ्या

श्री कोरे, अभियंता पवनार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here