पोलिसांनी राबविले ‘कोम्बिंग ऑपरेशन’! १६ गुन्हेगारांची अटक अन्‌ कोर्ट रवानगी

वर्धा : पोळा या सणा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून रामनगर व शहर पोलिसांनी संयुक्तपणे कोम्बिंग ऑपरेशन राबविले. रात्रदरम्यान राबविण्यात आलेल्या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान तब्बल १६ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कोर्ट रवानगी केली आहे.

कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस स्टेशन वर्धा शहर हद्दीतील हिस्ट्रीशिटर, हत्या बाळगणारे तसेच दारू विक्रेते यांना तपासण्यात आले. कार्यवाही दरम्यान दारूविक्रेते पूजा काळुराम मुळे (रा. आर्वी नाका), फरजाना अजीज खान व अतीत भगवान जाट (रा. इतवारा), सौरभ वासनिक, (रा. इतवारा), लक्ष्मण/माचिस मुळे, (रा. आर्वी नाका), दीपक/ दीपू साळवे (रा. कंजर मोहल्ला), विजय मसराम (रा. इंदिरानगर), मनीष भुजाडे (रा.अयोध्यानगर), प्रभाकर कुमरे (रा. तुकाराम वॉर्ड) यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली, तर आरोपी आफताब/सोहेल मोंढा अखील खान (रा. स्टेशन फैल), चंदन रामचंद्र येंडाळे (रा. स्टेशन फैल), शहदाब खान मुखतार खान पठाण (रा. बोरगाव (मेघे), अजय राठोड (रा. बोरजाव (मेघे)), सुरज राजू लष्कर (रा. आर्वी नाका) यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

विशाल कुराडे (रा. आर्वी नाका), रूपेश विनायक इंगोले (रा. काजळसरा) यांच्यावर कलम १२२ मुपोका अन्वये गुन्हे कार्यवाही करण्यात आली. तसेच आरोपी निखील शेळके (रा. आकोली यांच्यावर कलम २७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतर संशयितांना कलम १४९ सी.आर’पी.सी. अन्वये तीन नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत चांदेवार, सहा. गणेश बैरागी, दिलीप तिजारे, सुरेश दुर्गे, सलाम कुरेशी, ज्योती देवकुळे, योगेश हिवसे, दिलीप पोले, सौरभ घरडे, जोपाल ढोले आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here