कामगाराचा मृतदेह आढळला शेत शिवारातील विहिरीत

तळेगाव (श्या.पंत.) : तळेगाव – आष्टी राज्य महामार्गावरील ममदापूर नजीकच्या पुलाचे काम पूर्णत्वास नेणाऱ्या कामगाराचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दीपक हरिवंश चौधरी (२८, रा. साहसराव, ता. भैरागंज, जि. ‘पश्‍चिमी चंपारन, बिहार) असे मृताचे
नाव आहे.

तळेगाव-आष्टी राज्य महामार्गाचे काम सध्या सुरू असून, ममदापूर शिवारात पूल उभारला जात आहे. हे विकासकाम वर्मा नामक कंत्राटदार पूर्णत्वास नेत असून, बिहार राज्यातील मजूर या कामासाठी बोलावण्यात आले आहेत. हे मजूर मोरेश्‍वर बुले यांच्या शेतात झोपड्या उभारून राहतात. अकरा मजुरांपैकी दीपक चौधरी या कामगारांचा शेतशिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आला. दीपक याला दारू, गांजाचे व्यसन होते, असे सांगण्यात आले. रात्री उशीर होऊनही दीपक झोपडीत परतला नसल्याने त्याचा शोध घेण्यात आला. दरम्यान, विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला, याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here