ट्रक-दुचाकीच्या अपघातात एक ठार! अपघाताची नोंद गिरड पोलिसांनी घेतली

समुद्रपूर : ट्रक-दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना गिरड-कोरा मार्गावरील साखरा बसस्थानकासमोर मंगळवारी रात्री घडली. एम. एच. २२ डी.एम, ५७०७ क्रमांकाच्या दुचाकीने विलास झाडे रा. ब्राह्मणी, जि.चंद्रपूर व साखरा येथील रामचंद्र नन्नावरे, विलास झाडे तिघेही नजीकच्या नारायणपूर येथे गेलेत.

पण परतीच्या प्रवासादरम्यान रामचंद्र याला दुचाकी चालकाने परत नेण्यास नकार दिल्यावरही तो हट्ट करीत दुचाकीवर बसला. भरधाव दुचाकी गिरड-कोरा मार्गावरील साखरा बसस्थानकजवळ येताच समोरून ट्रक येत असल्याने चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. अशातच तोल गेल्याने तिघेही खाली पडले. दरम्यान, धावत्या ट्रकखाली आल्याने रामचंद्र नन्नावरे याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद गिरड पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here