नदी पुलावरून कार कोसळली; आमदारपुत्रासह ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू! पंतप्रधान मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

वर्धा : कारवरील नियंत्रण सुटल्यानं एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. देवळी येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. जवळपास ४० फूट उंच असलेल्या पुलावरून कार खाली पडल्यानं भीषण अपघात झाला. यामध्ये गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याच्यासह नीरज चौहान, नितेश सिंग, विवेक नंदन, प्रत्युश सिंग, शुभम जयस्वाल, पवन शक्ती या सहा जनांचा समावेश आहे.

अविष्कार वर्धा येथे दत्ता मेघे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचा अभ्यास करत होता. रात्री वर्ध्याला परत येत असताना त्यांची कार नदीत कोसळली. या अपघातात त्याच्यासह सातही मित्रांच्या दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलीस निरीक्षक घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहे. अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here