कराळे गुरुजींच्या टिमचे कार्य महान! भुकेल्यांसाठी दान मिळवत केले अन्नछत्र तयार; रोज शेकडो भुकेल्यांची भागवीतात भूक

राहुल खोब्रागडे

वर्धा : लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असनार्यांची परिस्थिती अतिषय वाईट आहे. त्यांचे दोन वेळच्या जेवनासाठी हाल होत आहे या कठीण परिस्थितीत गेल्या काही दिवसपासून खद खद मास्टर म्हणून ओळखले जाणारे नितेश कराळे आणि त्यांची टिम शहरातील गरजु लोकांची भूक भागवत आहे. रोज शेकडो भूकेल्यांना मसाले भात, उपमा, खिचडी अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून भूकेल्यांपर्यंत पोहचविण्याचे काम लॉकडाउनच्या काळात त्यांच्या माध्यमातून अविरत चालू आहे.

या कार्यासाठी श्री कराळे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन अनेकांकडे दान मागत त्या मिळालेल्या दानातून हे अन्नदानाचे कार्य त्यांनी चालू केले आहे. सोबतच अनेकांच्या घरच्या चूली पेटाव्या म्हणुन काही जीवनावश्यक साहित्याची एक किट तयार करुन त्यांनी गरजू कुटूंबाना देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.

त्यांचे हे लोकउपयोगी काम पाहुन या कार्याकरीता त्याना अनेक दानदात्यांनी सढळ हाताने मदत केलेली आहे. आतापर्यंत लाखो रुपयांची मदत त्यांच्यापर्यंत पोहचली आहे. याच मदतीच्या जोरावर ते भुकेल्यांना अन्नदान करुन पोट भरत आहे. त्यांचे हे सेवाकार्य पाहुण अनेकांना त्यांचा हेवा वाटत आहे. त्यातून अनेक लोक त्यांना मदतीचा हात देत आहे.

काही दिवसांपूर्वी पवनार परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घराचे छप्पर उडाले. घरी साठविलेले अन्नधान्य वाया गेले लॉकडाउनच्या या परिस्थितीत कोणीही मदत करायला तयार नव्हते याची माहिती श्री कराळे गुरुजींना मिळताच त्यांनी आपल्या टिमसह या नागरीकांना प्रत्यक्ष भेटी देत त्याना धीर देत जीवनावश्यक वस्तूं आनून देत घराच्या दुरुस्तीकरीता रोख रक्कम दिली.

यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त कुटूंबियांना धीर देत मायेने त्यांच्या पाठीवरुन हात फिरवीला त्यांच्या या मदतीकरीता अनेकांनी त्यांचे आभार यावेळी व्यक्त केले. माणसातला देव माणुस आपल्या रुपात दिसत असल्याच्या भावना लोकांनी यावेळी व्यक्त केल्या. या कार्यात त्याच्या सोबत मोहित सहारे, सुरज भस्मे, सोनू मुंगले, विवेक कोडपेल्ली, मनिश कादरला, अतुल लेंडे, रंजित कांबळे, आकाश कुंभारे, अमर पुसदकर, वैभव लिंगडे, संदेश पाणतावने यांचे सहकार्य आहे.

………………………

कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धा बनुन श्री कराळे गुरुजी आणि त्याची टिम लॉकडाउनच्या काळात सतत गरजुंच्या मतदीकरीता धावून जात आहे. झोपडपट्टीत घरोघरी जाउन कुणीही उपाशापोटी झोपु नये याची काळजीळज घेत आहे. सायकलरिक्षाचालक, मजूर वर्ग, हातगाडीवाले अशा सर्वच नागरीकांना त्याची टिम भेटत आहे. त्यांना आस्तेने विचारपुस करीत त्यांना दोन वेळच्या जेवनाची सोय करुन देत आहे. रस्तयावर फिरनारे मानसीक रुग्ण असो की पारधी बेड्यावरील कुटूंब, मजूरी करणारे हात सर्वांचा शोध घेत कोणतेही कुटूंब उपाशापोटी झोपणारे नाही याची काळजीळज घेतात सर्वांसाठीच ही टीम काम करत आहे. या कार्यातून त्यांचा मोठेपना पहायला मिळत आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

  1. कुणीही उपाशीपोटी झोपु नये हाच एकमेव उद्देश यामागचा आहे. आणि मी काही माझ्या ऐकट्याच्या खिशातून हे सर्व करत नाही तितका मोठा मी नाही. लोकवर्गणीतून आम्ही ही सर्वी मदत गरजूंपर्यंत पोहचवित आहो. या कार्यासाठी लोक आम्हाला मोठ्या मनाने मदत करीत आहे. त्यातून रोज आम्ही १५० ते २०० लोकांची भुक भागवत आहो. लॉकडाउनच्या काळात अनेकांची रोजगार बंद आहे. रस्त्यावर फिरणारे, मानसिक रुग्ण अशा सर्वांचीच आम्ही भुक भागविण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहो.

नितेश कराळे, संचालक फोनिक्स (phoenix) अक्यॉडमी वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here