
पवनार : या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे याची साक्ष देणारा पवनार गावातील ऐतिहासिक वास्तू दिल्ली दरवाजा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. या वास्तूची दुरुस्ती करून सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी येथील माजी सरपंच अजय गांडूळे यांनी निवेदनातून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे केली आहे. दिल्ली दरवाजाची दुरुस्ती व्हावी याकरिता वारंवार मागणी करण्यात आली याकरिता निधीही मंजूर झाला मात्र अद्याप याच्या दुरुस्तीला सुरवात झाली नाही. परिणामी ऐतिहासिक ‘दिल्ली दरवाजा’ शेवटच्या घटका मोजत आहे. या एकमेव ऐतिहासिक वास्तूचे सौरक्षण व्हावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


















































