मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकरी ठार! मोहगाव येथील घटना; परिसरात व्यक्‍त केले जातेय हळहळ

समुद्रपूर : मधमाश्यांच्या हल्ल्यात वयोवृद्ध शेतकरी ठार झाला. ही घटना नजीकच्या मोहगाव शिवारात घडली. महादेव जागोबाजी राऊत (रा. मोहगाव), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. महादेव हे शेतात काम करीत असताना अचानक मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यात गंभीर जखमी झालेल्या महादेव यांना गिरड येथील रुणालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली; पण नंतर अचानक प्रकृती बिघडली आणि महादेव यांचा मृत्यू झाला. शेतकरी महादेव राऊत यांच्याकडे चार एकर शेतजमीन असून, या घटनेमुळे राऊत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. राऊत कुटुंबाला शासकीय मदत द्यावी, अशी मागणी मोहगावचे सरपंच विलास नवघरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here