सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी जामुनकर यांचा सत्कार! उत्कृष्ठ कार्य केल्याची नागरीकांची भावना

वर्धा : पिपरी (मेघे) ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी रामदास जामुनकर हे सेवानिवृत्त झाले यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामवसीयाना चांगल्या प्रकारे सेवा दिली. त्यामुळे ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरीकांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
रामदास जामुनकर यांनी ३४ वर्ष जिल्हा परिषद मध्ये कार्य केले. तसेच पिपरी (मेघे) ग्रामपंचायत येथील ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा दिली, पिपरी ग्रामपंचायत येथे सेवा देत असतांना त्यांचे नेहमी सर्वांशी आपुलकीचे नाते जोपासले त्यामुळे सर्वांच्या मनात त्यांच्याविषय आदरभाव होता. ते सेवानिवृत्त झाल्याने त्याचा ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच अजय गैळकर, सामाजिक कार्यकर्त्यां वैशाली टिपले, पल्लवी राऊत, संगीता कामंटकर, संस्कृती टिपले, माहेश्वरी राऊत, शारदा राऊत यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here